कन्हान : पोलीस स्टेशन अंतर्गत ज्ञान कोचिंग क्ला सेस येथे पोलीस निरिक्षक मा. राजेंद्र पाटील हयानी १२ वी च्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेऊन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्याने मार्गदर्शन व अमली पदार्थ सेवन करणार नाही. अशी शपथ देऊन आणि पोस्टे कन्हान येथे दर्शनी स्थळी बँनर लावुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
गुरूवार (दि.२६) जुन २०२५ ला जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्याने पोलीस स्टेशन कन्हान व्दारे हद्दीतील ज्ञान कोचिंग क्लासेस आंबेड कर चौक कन्हान येथे कोचिंग क्लासेस चे प्राध्यापक श्री प्रशांत मंदाळे सर आणि वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यां ना अमली पदार्थ व त्यापासुन होणारे नुकसान आणि दुष्य परिणाम बाबत कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील हयानी मार्गदर्शन करून विद्यीर्थ्याना अमली पदार्थ सेवन करणार नाही याबाबत शपथ देण्यात आली. याप्रसंगी इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेणारे मुले, मुली बहु संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस स्टेशन परिसरात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे बँनर दर्शनी स्थळी लावण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र पाटील साहेब पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन कन्हान, नापोशि आतिश मानवटकर हयानी प्रामुख्याने उपस्थित राहुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला.
For News and Ads contact ASP Global News: 9373109809