कन्हान : ” गुरु शिष्यांचे अतुट नाते हिच महाराष्ट्रा ची उत्तुंगस्थानी असलेली परंपरा.” गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधुन मंगलसमयी विकास हायस्कुल बँच १९८०-८१ चे माजी विद्यार्थी वर्गमित्र परिवार व्दारे गुरूजनांचे पुजन, गौरव करून शुभ आशिर्वाद घेऊन गुरूपुजेचा कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.
विकास हायस्कुल बँच १९८०-८१ चे माजी विद्यार्थी वर्गमित्र परिवार व्दारे डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे श्री गणेश आणि विठ्ठल रूख्मिनी चे विधीवत पुजन करून माजी विद्यार्थ्यीनीने स्वागत गिताने आणि फुल पाकळयाच्या वर्षावाने उपस्थित सर्वाचे स्वागत केले. सर्व वर्गमित्रानी श्री दिवाळुजी देशमुख गुरूजी, पी पी पोतदार सर, एकनाथजी खर्चे सर, मंडपे सर, धावडे सर, मालविये सर, वेणुताई बारई मँडम, फरसोले मँडम, मांधाते मँडम, फुलबांधे मँडम, चिंचुलकर मँडम, मंडपे मँडम, पटले मँडम, पोतदार मँडम, माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके मँडम आदीचे पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि विठ्ठल रूख्मि नीची मुर्ती भेट देत गौरव करित त्यांच्या चरणास नमन करून शुभ आशिर्वाद घेतला. याप्रसंगी गुरूवर्य आणि शिष्यानी आपले मनोगत व्यकत केले.
इयत्ता १ ली ते १० व्या वर्गापर्यंत बालवयापासुन तर थेट १६ वर्षाच्या ओल्यामातीला आकार देऊन जग ण्याचा मुलमंत्र आम्हाला विकास हायस्कुल कन्हान या पुज्यनिय विद्येचा मंदिरात मिळाला. या प्रतिष्ठाणेत वंद निय गुरुजनांनी आधुनिकतेच्या स्पर्धेत यथायोग्य, यश स्वि नागरिक व चारित्र्याचे अनुष्ठान घडविले. जिवनास आकार मिळाला. ते आम्हीच… हे आमचे भाग्य. आता आम्ही वर्ग मित्र, मैत्रीनी वयाच्या ६० वर्षाच्या उंबरठ्या वर उभे असुन कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत गुरू जनाच्या आर्शिवादाने भविष्य जिवन पथावर वास्तव्या शी सामना करुन यश संपादित करित जिवनातील सा ठविलेल्या वर्गमित्राच्या आठवणी, भावना, ओलावा, सर्वस्वाचा अनंत ठेवा आहे. १ ली ते १० वी पर्यंत शिकविणारेच गुरूवर्य खरे गुरू म्हणुनच गुरू शिष्या च्या सोहळ्यात गुरुजनांचा आर्शिवाद म्हणजेच या जन्मीचे “गुरुतिर्थच”. होय. असे गौरव मनोगत माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयांनी व्यकत केले. याप्रसंगी शरद डोणेकर, गोपाल कडु, मोहन लोहकरे, किशोर बेलसरे, गणेश पानतावने, डॉ जामोदकर, गुलाबराव लोडेकर, माजी मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव,मुख्या ध्यापक वामन मन्ने, सचिन अल्लडवार सह परिसरातील मान्यवर, गुरूजन, प्रतिष्ठीत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमलेश पांजरे यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, गोविंद जुनघरे, विजय डोणेकर, उमराव पाटील, प्रदीप वान खेडे, प्रेम रोडेकर, शंकर राऊत, देवानंद साकोरे, दिलीप येलमुले, जिवन लिल्लारे, प्रभाकर ताजणे, मोरेश्वर उके, नथ्थुजी लंगडे, अशोक पोटभरे, सुनिल लाडेकर, सुधाकर सोनुले, लताताई साकोरे, चंपाताई गजभिये, कल्पना वाघमारे, सुनंदाताई वांढरे, संघमित्रा खोब्रागडे, माधुरी नांदुरकर आदी माजी वर्गमित्रा सह दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, रूपेश सातपुते, सतिश साळवी, पुरूषोत्तम येणेकर, राजेश गणोरकर, प्रतिक जाधव, आकाश आंजनकर यानी सहकार्य केले.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809