कन्हान : विकास हायस्कुल येथे सत्र १९८६-८७ च्या १० वी पर्यंत सोबत शिक्षण घेतलेला वर्गमित्र सुभाष अढाऊ नागपुर जिल्हयात पोलीस शिपाई पासुन अमरावती जिल्हयात पो.उप.निरिक्षक पदावरून सेवानिवृत झाल्याने वर्गमित्रानी रामधाम मनसर येथे जुने वर्गमित्र स्नेह भेट सहलीचा अस्मरणिय विशेष कार्यक्रम आयोजित करून सु़भाष अढाऊ यांचा वर्ग मित्रानी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
विकास हायस्कुल कन्हान येथे इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत सोबत शिक्षण घेत सन १९९८ ला वर्ग मित्र सुभाष नारायणराव अढाऊ हा पोलीस शिपाई म्हणुन रूजु होऊन कन्हान पोस्टे ला पीएसओ रॉईटर म्हणुन कार्य करून समर्पण, आत्मविश्वास, आत्मियता , प्रामाणिकपणामुळे पो.उप.निरिक्षक पदी मजल गाठुन ” सजन्नाचे स्वरक्षण आणि दुर्जनाचा नाश ” धेय सामोर ठेऊन प्रत्येक पोलीस स्टेशन ला निर्वाद ५ वर्ष सेवा कार्यकाल पुर्ण करित नागरिकांच्या समस्या सोड विण्यास पुढाकार घेत असल्याने चांगले लोकसहभाग लाभुन अपंग, गरजु व गरीबाची सेवा त्यांच्या हातुन झाली. कित्येक अनोळखी मुतदेहाचे अंतिम संस्कार सुध्दा केलेत. सेवाकाळात कुठलेही गालबोट न लाग ता ३६ वर्ष ७ महिने सेवाकाळ पुर्ण करून मा. पोलीस अधिक्षक कार्यालय नियंत्रण कक्ष अमरावती ग्रामिण येथुन (दि.३१) मे २०२५ ला मानसन्मानासह सेवा निवृत्त झाल्याचे कळताच विकास हायस्कुल कन्हान येथील सत्र १९८६-८७ च्या १० वी बँच च्या वर्गमित्रा नी रामधाम वॉटर पार्क येथे स्नेहमिल्लन सहलीत वॉटर पार्क आंनद लुटुन सोबत शिक्षण घेतलेले वर्ग मित्र सुभाष नारायणराव अढाऊ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन हुदयस्पशी भव्य सत्कार करून पुढील काळात सदृढ आरोग्याच्या सर्वानी शुभेच्छा दिल्या. आणि सर्व मित्रानी एकत्र स्नेह भोजन करून बर्ड पार्क व रामधाम पर्यटन स्थळाचा मनसोक्त आंनद लुटला. सायंकाळी सर्व मित्र कन्हान ला येऊन सर्वानी गळयाला मिठी मारून हसत हसत आपआपल्या गावी परत गेले. याप्रसंगी मोहन यादव, सचिन अल्लडवार, निलकंठ मस्के, नितीन वानखेडे, मनोज बागडे, रंगराव पोटभरे, सुभाष अढाऊ, संजय चौकसे, रामेश्वर सवाईतुल, दिलीप डांगे, नरेंद्र खडसे, सुरेश भिवगडे, मोतीराम रहाटे आंनद चंहादे, राधेश्याम ठाकरे, योगीराज रंगारी, सुरेश वंजारी, चंद्रशेखर घोटेकर, दिलीप टिकले, सिताराम सरोदे, संभाजी मस्के, सुरेश वंजारी, प्रमोद बावनकुळे, विजय कोलते, बाळकृष्णा देशमुख, अनिल डोंगरे, धनराज तरार, गजानन उके, राजेश गणोरकर आदी वर्गमित्र प्रामु ख्याने उपस्थित होते.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809