कन्हान : पोलीस स्टेशन हद्दीतील डुमरी खुर्द येथील चैत्यन्य राईस मिल मध्ये माथेफिरू अज्ञात व्यक्तीने आग लावुन पसार झाला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने मिल मालकाच्या तक्रारीवरून पोस्टे कन्हान येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार सुर्यभगवान सुभ्रमन्य टोन्टेन्यु वय (६९) रा. डुमरी खुर्द हे १६ वर्षा पासुन मुलगा व पुतण्या सोबत एकत्र मिळुन राईस मिल चालवित आहे . रविवार (दि.२२) जुन ला सकाळी ५:३० वाजता दर म्यान राईस मिल मध्ये काम करणारा मजदुर शंकर ऋषीदेव याने सुर्यभगवान यांना सांगितले की, राईस मिलच्या कार्यालयातुन आगीचा धुर निघत आहे. सुर्य भगवान आणि रंगराव दोघेही मिल मध्ये गेल्यावर कार्यालयातुन धुर निघताना दिसले. कार्यालयाचा दर वाजा बंद असल्याने दरवाजा चाबीच्या सहाय्याने उघ डुन आग आटोक्यात आणली. राईस मिल कंपनीचे मालक सुर्यभगवान आणि इतर लोकांनी कंपनी मध्ये लावलेल्या सीसीटीवी कैमरे ची पाहणी केली असता पहाटे चार ते पाच वाजता दरम्यान एक अज्ञात व्यक्ती ने कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडुन आत जाताना डोक्यावर रिकामी पिवळी प्लास्टिकची पिश वी ठेवुन आपली ओळख लपवताना दिसुन आला. त्याने आंगात काळी फुल पँट, सिमेंट रंगाचे फुल शर्ट, काळा दुपट्टा आणि काळे बूट घातलेले दिसला. त्याने कार्याल याच्या पूजा मंदिरातुन तेल आणि माचिसच्या काड्या घेऊन अज्ञात व्यक्तीने ओळख लपवुन कार्याल यास हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यालयातील वस्तुंना जाणुनबुजुन आग लावली. आगीत डेल कंपनी चा पीसी मॉनिटर, दोन प्रिंटर एचपी कंपनी, जिओ नेट कनेक्शन बाॅक्स, लाकडी दोन टेबल, एक कुलर व दोन फँन, एक सीसीटीवी कैमरा असा एकुण १,०८,५०० रुपयांचा मुद्देमाल जळुन खाक झाल्याने पोलीसांनी मिल मालक सुर्यभगवान यांचा तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हाण करित आहे.
For News, Ads Contact ASP Global News : 9373109809