कन्हान : शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक पालक आणि मुलासाठी खूप खास असतो. कारण ही फक्त शिक्षणाचीच नाही, तर त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचक अध्यायाची देखिल सुरुवात असते. पहिला दिवस या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यां चा उत्साह वाढावा या साठी खासदार श्यामकुमा बर्वे यांच्या संकल्पनेतुन शालेय विद्यार्थ्यांना स्टडी टेबल वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील वर्ग चार, पाच ते सात च्या विद्यार्थ्यां ना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांच्या हस्ते स्टडी टेबल वितरित करण्यात आले. यावेळी बर्वे यांनी विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशोत्सवा निमित्त शुभेच्छा दिल्या. टेकाडी जि प शाळा येथील विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या आणि शाळेतील शैक्षणिक पद्धती पाहुन शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी माजी जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे, सरपंच विनोद इनवाते, ग्रा पं सदस्य सतीश घारड, ग्राम विकास अधिकारी राहुल डोरले, डॉ स्वाती राऊत, मुख्याध्यापिका सुनंदा भगत, शिक्षिका जयश्री चवरे, पुंडलिक इंगोले, नंदकिशोर निमकर, एकनाथ गुरधे, नत्थु मोहाडे, अतुल कुरडकर, प्रविण चव्हाण, अशोक राऊत, मारोती हूड, विशाधर कांबळे, कमलाकर राऊत, दिवाकर उमाळे, विजय वासाडे यांचे सह अंगणवाडी सेविका आणि पालक वर्ग उपस्थित होते.जि.प. शाळा कांद्री येथे शालेय विद्यार्थ्याना स्टडी टेबल . शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा या साठी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या संकल्पनेतुन शालेय प्रवेशोत्सवा निमित्य जि. प. शाळा कांद्री- कन्हान येथील विद्यार्थ्याना शाळेचा पहिल्या दिवशी जि. प. नागपुर च्या माजी अध्यक्षा रश्मीताई श्यामकुमार बर्वे यांचा व्दारे स्टडी टेबल वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी जि प नागपुर अध्यक्षा रश्मीताई बर्वे, माजी सरपंच बलवंत पडोळे, राजु देशमुख, नरेश पोटभरे, प्रकाश चाफले, बैसाकु जनबंधु, चंद्रशेखर बावनकुळे, महेश झोडावणे, दुर्गाताई सरोदे, मोनाताई वरले, वर्षा ताई खडसे, गणेश सरोदे, प्रमोद गि-हे, सोनु परिहार, गोलु वांढरे सह शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षिका सह अंगणवाडी सेविका आणि पालक, नागरिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Ad : For News and Ads contact ASP Global News :9373109809