वर्धा: अश्वघोष कला व सांस्कृतिक मंच वर्धा यांच्या वतीने, लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त आणि स्मृतीशेष श्रीकांत जांभुरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित, भव्य राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा – 2025 काल, रविवार, २२ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. बजाज सार्वजनिक वाचनालय, वर्धा येथे सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात बुद्ध भीम गीतांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर येथील श्रीमती सविता ताकसांडे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्धा येथील श्री. मुन्ना नाखले यांनी भूषवले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. मिलिंद सवाई, प्रा. राजेश डंभारे, प्रा. ज्ञानेन्द्र मुनेश्वर, पद्मा तायडे, प्रशांत जारोडे, मोहन शेवडे, भंते राजरत्न, राजुथूल, शाहील दरणे, आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धनंजय नाखले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील सुप्रसिद्ध गायक, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या बुलंद आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार मांडत ‘माझ्या दहा भाषणा एवढी ताकद, शाहिरांच्या एका गाण्यांमध्ये असते’ हे पटवून दिले. त्यांनी ‘आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्यामुळे, वादळ रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला.
यावेळी गायक विजय मोरे, गायिका मंदा वाघमारे, गायक महेंद्र सावंग, दीपमाला मालेकर, कवी कमलेश पाटील, गायिका लाजरी भुरे, लाल चंद्र डांगे, गायिका जया मोरे, प्रकाशजी दे, लक्ष्मीनारायण सोनवणे, विशाल मानकर, मुकुंद नाखले, प्रदीप थूल, सुनील ढाले आदी कलावंत उपस्थित होते. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गायक आणि कलावंतांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धनंजय नाखले यांनी या भव्य स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले, तर शाहील दरणे यांनी ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन केले.
For News and Ads contact ASP Global News: 9373109809