
कन्हान : गत काही दिवसांपासून कन्हान येथील घरगुती वीजपुरवठा सतत बंद होत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. ह्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईडीसीएल)च्या हनुमान नगर येथील कार्यालय येथे जाऊन उपअभियंता श्री. किशोर निंबाळकर व वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.त्यांनी मागणी केली की, “वारंवार होणाऱ्या वीजखंडितेमागील कारणांचा सखोल अभ्यास करून तातडीने उपाययोजना करावी.”
विभागीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
चर्चेदरम्यान, उपअभियंता निंबाळकर यांनी सांगितले की,“कन्हानमधील फिडर क्षमता अपुरी असल्यामुळे वीजपुरवठा अडखळतो. सध्या फिडरची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे.“येथे सब-स्टेशनसाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने प्रकल्प अडखळला आहे. तथापि, पर्यायी उपाययोजना करण्यात येत आहेत.“शहरातील वीजपुरवठा स्थिर करण्यासाठी तांत्रिक दुरुस्तीची कामे चालू आहेत.”
नागरिकांची अपेक्षा
स्थानिक रहिवाशांनी विभागाकडे तक्रारी नोंदवून वीजखंडितेमुळे होणाऱ्या अडचणी सांगितल्या आहेत. अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर समस्या सुटण्याचे आश्वासन दिले असले तरी, नागरिक सुविधा प्राधान्याने सुधारण्याची मागणी सामाजिक संघटना करत आहे.
Advertisement :
