शेतकऱ्यांच्या मागणीने खासदार बर्वे च्या पुढाका राने पेंढरवाही नाल्यावर आरयूबी मंजुर

कन्हान : शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे असलेल्या मागणी ला प्राथमिकता, ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेत खासदार शामकुमार बर्वे यांच्या प्रयत्नांनी रेल्वे विभागाकडुन लवकरच पेंढरवाही नाल्याजवळ शेतकऱ्यांच्या हितार्थ एक अंडर ब्रिज बांधण्यात येणार असल्याने शेतकऱ्यां नी खासदार बर्वे यांचे आभार मानत अनेक वर्षाचा शेतकऱ्यांच्या संघर्ष पूर्ण झाल्याचे मत व्यकत केले.
शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना टेकाडी – बोरडा रस्त्यावरील रेल्वे लाईनवरून पेंढरवाही नाला ओलांडु न जीव धोक्यात घालुन जावे लागत होते. नाल्यावर अंडर ब्रिज बांधण्याची मागणी शेतकऱ्यां कडुन वर्षा नुवर्षे केली जात होती. शेतकऱ्यांसह ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड यांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांची भेट घेत त्यांना समस्येची माहिती देत पुलासाठी निवेदन सादर करून वेळोवेळी खासदार बर्वे यांचे लक्ष सबंधित विषयाकडे वेधुन घेतले. खासदार बर्वे यांनी २५ जानेवारी ला मध्य रेल्वे बोर्ड नागपुर विभा गाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सोबत बैठक घेऊन पेंढरवाही पुलाच्या समस्येवर कायम स्वरूपी उपाय म्हणुन शेतकऱ्यांना शेती सुरळीतपणे करता यावी म्हणुन आरयुबी (रेल्वे अंडरपास ब्रिज) बांधण्याची सूचना केली. ज्याची रेल्वे विभागाने तात्का ळ दखल घेऊन १७ फेब्रुवारी २०२५ ला रेल्वे विभागा च्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. सध्या अंडर पास ब्रिजला मंजुरी मिळाली आहे. ११ जुलै २०२५ रोजी रेल्वे अधिकारी वरिष्ठ विभाग अभियंता व्ही.डी. राधाकृष्णन, वरिष्ठ विभाग अभियंता अभिषेक निनावे, रेल्वे अधिकारी राजेंद्र गोंडाणे आणि कंत्राटदार यांनी पुन्हा पेंढरवाही नाल्याला भेट देत शेतकऱ्यांना पुला च्या बांधकामाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या सूचनां नुसार अधिकाऱ्यांनी पुलाचे स्थान, ड्रेनेज, आरसीसी रस्ता, पुलाखालील सुविधांची दखल घेतली आणि पुलाचे बांधकाम लवकरच सुरू करणार असुन जुलै २०२६ पर्यंत काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या वाहतुकी साठी तो खुला करण्याची अंतिम मुदत दिली आहे. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड, नंदकिशोर निमकर, कमलाकर राऊत, भगवानदास यादव, धर्मरा ज शिंगणे, शैलेश सातपैशे, मारोती हुड, विशाधर कांबळे, श्रीकृष्णा वासाडे, अशोक राऊत, ज्ञानेश्वर नाकतोडे, राजु गुडधे, आदी शेतकरी प्रामुख्याने उप स्थित होते.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *