कन्हान : विकास प्राथमिक शाळा आणि श्री बळी रामजी दखणे हायस्कुल कन्हान येथे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्याना रोटी फाऊंडेशन मुंबई व्दारे प्रोटिनयुक्त खाऊ आणि प्राथमिक च्या विद्यार्थ्याना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
विकास प्राथमिक शाळा कन्हान व बळीरामजी दखणे हायस्कुल कन्हान येथे मुंबई रोटी फाउंडेशन चे सन्माननी सी .एम. बागरिया व श्री संजय सरकार यांचे विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत यांनी मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत केले. आणि दखणे हायस्कुलचे मुख्याध्यापक सचिन अल्ल डवार हयानी व्यवस्थापन कमिटी चे अध्यक्ष वाय. जी. पशीने यांचे सुद्धा स्वागत केले. रोटी फाऊंडेशन च्या माध्यमातुन उपस्थित शाळेच्या विद्यार्थ्यांना राजगिरा लाडु, सोनपापडी, मटरी सोया मिल्क यांचे वाटप कर ण्यात आले तसेच प्राथमिक विभागातील व हायस्कुल च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती सोबतच शारीरिक विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांत शिक्षणा सोबत खेडाळु प्रवृत्ती निर्माण होऊन उत्कुष्ट खेळाडु तयार व्हावेत अशा सार्थ हेतु ठेवुन विद्यार्थ्यांना बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट बॅट सह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिलेले साहित्य व खाऊ बघुन त्यांच्या आनंद मावेनासा झाला. हे सर्व बघुन शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आनंदीत झाले. मुख्या ध्यापक राजेंद्र खंडाईत यांनी रोटी फाउंडेशन मुंबई व्दारे विद्यार्थ्यांना निशुल्क खाऊ व खेड साहित्य दिल्याबद्दल त्यांच्या या कार्यांचे कौतुक करून भवि ष्यात आपल्या कडुन या गरीब विद्यार्थ्यांना असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा करण्यात आले.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809