राष्ट्रीय महामार्गालगत दुकानदारांच्या पुनर्वनास व्यापारी संकुल बनविण्यात यावे

कन्हान : शहरातील राष्ट्रीय महामार्ग (एनएचएआय ) रस्तालगतच्या जागेवर पारंपरिक व लघु व्यापाऱ्यां च्या पुनर्वसनासाठी व्यापारी संकुल उभारणीसंबंधी ठराव व आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी कन्हा न हॉकर्स युनियन, कन्हान कृती समितीच्या शिष्टमंड ळाने नगपरिषद मुख्याधिकारी मा. दिपक घोडके हयाना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्ग (एनएचए आय) रस्त्यालगत आनंद रेस्टॉरंट पासुन इंडियन होम पाईप कंपनी पर्यंत महामार्गाच्या बाजुला अनेक पारंप रिक लघु व्यापारी व अस्थायी दुकानदार मागिल ३० – ४० वर्षांपासुन आपल्या उपजीविकेकरिता व्यवसाय करित आहे. सदर परिसरात रस्त्याचे रुंदीकरण, नाली बांधकाम व अन्य नागरी सुविधा प्रकल्प पूर्ण झालेले असुन उर्वरित शिल्लक जागेचा वापर व्यापारी संकुल उभारणीसाठी करणे शक्य आहे. कन्हान नगरपरिषद हद्दीत शासकीय जागेचा अभाव असुन नगर परिषदेला नागरिकांच्या मूलभुत सुविधांसाठी आवश्यक राखिव जागाही मर्यादित आहे. त्यामुळे “कमीत कमी जागेचा अधिकतम उपयोग कसा करता येईल” या दृष्टीने शह रातील राष्ट्रीय महामार्ग (एनएचएआय) रस्तालगतच्या जागेचा योग्य वापर करणे गरजेचे वाटते. या पार्श्वभुमि वर कन्हान हॉकर्स युनियनने (दि.१२) सप्टेंबर २०२४ ला नगरपरिषदकडे निवेदना द्वारे मागणी केली होती की, सदर जागा व्यापारी संकुल उभारणीसाठी वापरा वी आणि त्या मध्ये प्राधान्याने पारंपरिक व अस्थायी दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात यावे. सदर निवेदना च्या अनुषंगाने मा. मुख्याधिकारी यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे की, सदर विषय सध्या मा. उच्च न्याया लय, नागपुर खंडपीठात प्रलंबित असुन अंतिम निर्णय प्राप्त न झाल्याने तत्काळ कार्यवाही करणे अशक्य आहे. तसेच मा. नगराध्यक्षा सौ. करूणा आष्टनकर यांनी (दि.२१) सप्टेंबर २०२४ ला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले की, मासिक सभेत यासंदर्भात ठराव घेऊन सदर प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात येईल. यानंतर उपनगराध्यक्ष मा. योगेंद्र रंगारी व नगरसेवक मनीष भिवगडे, विनय यादव, नगरसेविका गुंफा तिडके , पुष्पा कावडकर, रेखा टोहणे व राखी परतेकी यांनी लेखी स्वरूपात या प्रस्तावास अनुमोदन दिले आहे. या ठरावात १) एनएचएआय रस्त्यालगतची जागा व्यापा री संकुल उभारणीसाठी उपलब्ध करून घेणे व नगर परिषद पातळीवर शासनास सादर करणे. २) प्राधान्या ने पारंपरिक व अस्थायी दुकानदारांना गाळे / व्यवसा यिक जागा पुनर्वसनाच्या स्वरूपात प्रदान करणे. ३) उर्वरित जागा भाडे तत्त्वावर इतर लघु व्यावसायिकां ना वितरित करून नगरपरिषदेला शाश्वत उत्पन्न मिळ विणे.
या विषयाचा संबंध अनेक नागरिकांच्या उप जिविकेशी व सामाजिक न्यायाशी संबंधित असल्याने प्रस्तावास पूर्ण गांभीर्याने हाताळण्यात यावे. सदर प्रस्तावास जलद कार्यवाही घडवुन आणण्यासाठी नियोजनपुर्व स्थावर प्रस्ताव, भू-स्वामित्व नकाशे, वित्तीय आराखडा यांची पूर्तता करून शासनास प्रस्ता व सादर करण्यात यावा. तसेच मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. अशी मागणी कन्हान हॉकर्स युनियन, कन्हान कृती समितीच्या शिष्टमंडळाने नगपरिषद मुख्याधिकारी मा. दिपक घोडके हयाना निवेदन देऊन केली आहे. निवेदनाच्या प्रत मा. मुखमंत्री, उपमुख्य मंत्री, महसुल मंत्री, राज्यमंत्री, रामटेक खासदार, मा. विभागिय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी रामटेक हयाना माहितीस व योग्य कार्यवाहिस अग्रेषित करण्यात आली आहे. शिष्टमंडळात चिराल वैद्य, अजय चव्हाण, प्रकाश सिंग, दिगांबर हारगुडे, नितिन मोरे, मंगेश मनगटे, रॉबिन निकोसे, प्रशांत मसार, नितिन मेश्राम, केतन भिवगडे, परमहंस सिंग, सुनिल खरवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *