कन्हान : नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र २ व ३ येथील लोकवस्ती भागातील नागरिकांना अनेक नागरी सुविधाच्या आडचनीचा सामना करावा लागत असल्या ने या ज्वलंत समस्याचे तात्काळ निराकरण करण्याची मागणी नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुखास निवेदन देऊन केली आहे.
नगरपरिषद कन्हान -पिपरी अंतर्गत प्रभाग क्र २ व ३ येथील दत्त नगर, कुशाजी नगर, एम.जी. नगर, सविधान नगर, विठ्ठल रुखमनी नगर, छगन बाबा दरगाह, राजिव गांधी चौक, विष्णु लक्ष्मी नगर, वाघधरे वाडी, तारसा रोड कन्हान या लोकवस्ती च्या भागाती ल नागरिकांना अनेक नागरी सुविधाच्या आडचनी चा सामना करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासन,नगर सेवक, लोकप्रतिनिधीचे या लोकवस्ती कडे पाहिजे तसे लक्ष नसल्यामुळे मागिल १० वर्षा पासुन समस्या वाढत असल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख आशिष अखाडे हयाना निवेदन देऊन प्रभाग क्र. २ व ३ येथिल तारसा रोड ला लागुन असलेल्या लोकवस्ती च्या नागरी सुविधाच्या समस्या तात्काळ निराकरण करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी नेवालाल पात्रे, अंबादास खंडारे, रघुनाथ पात्रे, भुरा पात्रे, सतिरा नाडे, किशोर शेंडे, केतन भिवगडे, नितिन मेश्राम, सागर पात्रे सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809