पिपरी बुद्ध विहारात धम्मदेशनाचे तीसरे चरण संपन्न

“धम्म: सत्त्वधम्माचे जीवन” या विषयावर भदंत के सी एस लामा चे मार्गदर्शन “

कन्हान,पिपरी : दिनांक 22जून रोजी सायंकाळी पिपरी येथील बुद्ध विहारात धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी “धम्म : सत्त्वधम्माचे जीवन” या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अनेक उपासक-उपासिकांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन मागील वेळेप्रमाणेच संध्याकाळच्या सत्रात करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक भदंत के सी एस लामा यांनी गौतम बुद्धांच्या शिकवणीवर आधारित सत्त्वधम्माचे महत्त्व, त्याची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता आणि समाजातील सुसंवाद वाढवण्यामधील भूमिका स्पष्ट केली.

उपस्थित भाविकांना त्यांनी धम्माचा स्वीकार केवळ धार्मिक नव्हे तर मानवतेच्या दृष्टिकोनातून करण्याचे आवाहन केले. त्यांनी मैत्री, करुणा, शील आणि समाधी यांचे महत्त्व अधोरेखित करत आर्य अष्टांगिक मार्गाची व्याख्या केली.कन्हान मद्दे जानते ने हर धम्मा चे अनुकरण केले तर समस्त कन्हान वसीयांचे कल्याण निशित होईल आसा उपदेश डेन्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आयोजक, स्थानिक उपासक मंडळी आणि पिपरी विहार समितीचे मोलाचे योगदान लाभले. या धम्मादेशनाचे आयोजनपिंपरी बुद्ध विहार व के सी एस लामा ट्रस्ट च्या वाटिने कारण्यत आले होते जय मद्देकेतन भिवगड़े,संदीप शेंडे,राजेश व राजेंद्र फुलजले,रॉबिन निकोसे,नितिन मेश्राम,गणेश भालेकर,संगीता व उपासराव खोबरागड़े ,भोजना चव्हाण, मीणा बागड़े,अनीता व कँचन पानतावाने, शीला खोबरागड़े, नीतू सोनटके,शालिनी गोंडाने, रंजू राउत आणि परिसरातील उपासक उपासिका उपस्थित होते।


Ad : For NEWS, Ads contact ASP Global News 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *