पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑरगँनिजेशन व्दारे शेकडो झाडाचे वृक्षरोपन

कन्हान : पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑरगॅनिजेशनेचे राज कुमार चहांदे यांच्या संकल्पनेतुन पर्यावरणाचा समतो ल राखण्याच्या दुष्टीने कन्हान शहर परिसरात विविध स्थळी लोकसहभागातुन चळवळ राबवुन शेकडो सप्त परणी, वड, पिंपळ, कडुलिंब, कदम, करंजी, बदाम, जामुन, आंबा, मोहगणी सहित अनेक झाडाचे वृक्षरो पन करण्यात आले.
मोठया प्रमाणात वृक्ष तोडीने पर्यावरणाच्या ढासळता समतोल आणि भविष्यातील पर्यावरणातील भयाणक संकट लक्षात घेता कन्हान येथिल राजकुमार चहांदे यांच्या संकल्पनेतुन पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑरगॅनि जेशन हि पर्यावरणा बाबत विशेष जागरूक असलेली संस्था गेल्या अनेक वर्षांपासुन कन्हान परिसरात दर वर्षी अनेक वृक्ष जागो जागी लावण्याचे कार्य करित असुन याही वर्षी रविवार (दि.६) जुलै २०२५ ला पर्या वरणाचा समतोल राखण्या करिता विशेष संकल्प घेत परिसरात शेकडो मोठी झाडे लावुन वृक्षरोपन करण्या त आले. पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑरगॅनिजेशने यावर्षी अने कांची मदत घेत लोकसहभागातुन एक मोठा सामाजि क संदेश समाजा पुढे ठेवलाय. कन्हान परिसरातील सर्वपक्षीय नेते, अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणाच्या चळवळीत सहभागी होऊन मोठया उत्साहात व तळमळीने सकाळ पासुनच संपुर्ण कन्हान परिसरात शेकडो सप्तपरणी, वड, पिंपळ, कडु लिंब, कदम, करंजी, बदाम, जामुन, आंबा, मोहगणी सहित अनेक झाडे लावुन यशस्विरित्या वृक्षरोपनाचे उत्तम कार्य केले. या उपक्रमास परिसरातील नागरिकां नी कौतुकाचा वर्षाव केला आणि भविष्यातील वाटचा लीस शुभेच्छा हि दिल्या. या वृक्षरोपन कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑरगॅनिजेशनेचे राजकुमार चहांदे, माजी नगरसेवक राजेंद्र शेंदरे,चिराल वैद्य, केतन भिवगडे, संदीप कुकडे, शैलेष दिवे, प्रविण गोडे, ओमप्रकाश काकडे, प्रविण सोनेकर, संजय चहांदे, निखिल पाटील आदीनी महत्वाचे सहकार्य केले.


For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *