कन्हान : – शहरातील महामार्गावरील नवीन पोलीस स्टेशनच्या बाजुला असलेल्या प्रशांत पान मंदिर आणि डेली निड्स दुकानाचे ताले तोडुन अज्ञात चोरट्यांनी ३२,९१३ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत उत्तम पाटील (४१) रा. कन्हान यांचे महामार्गावर कन्हान पोलीस स्टेशन बाजुला प्रशांत पान मंदिर आणि डेली निड्स नावाचे दुकान आहे . प्रशांत रोजच्या प्रमाणे गुरुवार (दि.१९) जुन ला रात्री दुकान बंद करुन निट दुकानाच्या शटर ला कुलुप लाऊन घरी गेला. शुक्रवार (दि.२०) जुन रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान प्रशांत दुकान उघडण्यास आला असता त्याला दुकानाचे दोन पैकी एक कुलुप तुटले ल्या अवस्थेत दिसुन आले. एका बाजुचे शटर खालुन दिड ते दोन फुटा पर्यंत उचलल्याचे दिसले आणि गल्ल्यात ठेवलेले चिल्लर पैसे खाली पडल्याचे दिसले . प्रशांत ने दुकानाचे शटर उघडुन आत प्रवेश करित पाहणी केली तर गल्ल्यात ठेवलेले रोख रक्कम ९००० रुपये आणि इतर सामग्री असा एकुण ३२,९१३ रुपयां चा मुद्देमाल मिळुन आला नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन ३२,९१३ रुपयांचा मुद्देमालाची चोरी करुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी प्रशांत पाटील यांचा तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हाण हे करित आहे.
सीसीटीवी कैमेराची पोलीसांनी केली पाहणी
प्रशांत पान मंदिर आणि डेली निड्स दुकानात झालेली चोरीची संपुर्ण घटना सीसीटीवी कैमरात कैद झाल्याने सीसीटीवी कैमरात अज्ञात युवकाने शटर चे कुलुप तोडुन दुकानात प्रवेश केला आणि चोरी करुन दुचाकी वाहनाने आंबेडकर चौकातुन वापस कामठी च्या दिशेने पळुन गेला. सदर घटनेची माहिती पोली सांना मिळताच पोलीसांनी दुकानात पोहचुन सीसी टीवी कैमरेची पाहणी करून सीसीटीवी फुटेज च्या आधारे कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
For News , Ads Contact ASP Global News : 9373109809