कन्हान : टेकाडी (को.ख.) या ग्रामिण भागातील रहिवासी कु. कृतिका गणेश मस्के हिने सारथी एज्युके शन संस्थेत शिक्षण घेऊन आयबीपीएस च्या परिक्षेत घवघवीत संपादन केल्याने एसबीआय नाशिक येथे क्लर्क या पदावर रूजु झाल्याने कन्हान परिसरातुन कु. कृतिका मस्के हिचे अभिनंदन करून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
टेकाडी (को.ख.) येथील रहिवासी गणेश मस्के पारशिवनी तालुका प्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची मुलगी कु. कृतिका गणेश मस्के ही एसबीआय क्लर्क, आरआरबी क्लर्क, आयबीपीएस क्लर्क या मध्ये निवड झाली असुन एसबीआय नाशिक येथे क्लर्क या पदावर पदभार सांबाळल्याने सारथी एज्युकेशन परिवार व्दारे छत्रपती संभाजी नगर येथे दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता प्रविण तरडे यांचे हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता सारथी एज्युकेशन संभाजीनगर येथील शिक्षक व त्यांच्या चंमु ने परिश्रम घेतले. या कार्यक्रमा करिता असंख्य विद्यार्थी, सर्वांचे आई वडील, सर्व शिक्षक, गुरुवर्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809