भारतीय संविधानाच्या अपमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
कन्हान : भारतीय संविधानाच्या अपमान करणाऱ्या कन्हान शहर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर देशद्रोहाच्या व अट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणी साठी कन्हान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रविवार (दिं.29) जुन रोजी आंबेडकरी जनतेकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.कन्हानच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी निवेदन स्वीकारून योग्य कारवाई करण्याचे आश्वस्त केले
बुधवार (दि.25) जून रोजी कन्हान शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कन्हान येथील तारसा रोड दिवटे भवन येथे संविधान विरोध दिवस कार्यक्रम केला. आणि कार्यक्रमांची बातमी वृत्त प्रत्रात प्रकाशित करण्यात आली. त्या बातमी मध्ये छापलेल्या मचकुरामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवले आहेत. अंतकरणास ठेस पोचली आहे.अश्या बातमी प्रकाशित करून समाजात – समाजात तेळ निर्माण करण्यावर प्रकाशित झालेल्या वृत्त प्त्रात बातमीत नावे तसेच छायाचित्रात दिसणारे व्यक्तीवर देशद्रोहाच्या व अट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यातबाबत लेखीतक्रार अर्ज देऊन तत्काळ प्रभावाने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कन्हान, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, पोलीस महासंचालक मुंबई,अनुसूचित जाति आयोग, मुंबई, राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग,दिल्ली, गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधानमंत्री भारतसरकार, उच्चतम न्यायालय, सरन्यायाधीश दिल्ली यांना प्रतीलीपी पाठवण्यात आल्या असून कारवाईला विलंब होत असल्याने कन्हान येथे आज जनआक्रोश आंदोलनातून रोष व्यक्त करण्यात आले.
यावेळी भदंत के.सी.एस.लामा, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भिमटे, योगेश रंगारी,प्रशांत वाघमारे,नितिन मेश्राम, राजेश फुलझेले, सुमेध नितनवरे, अभिजित चांदूरकर, शैलेश ढोके, मनोज गोंडाणे, नितेश मेश्राम, रविंद्र दुपारे, मनीष भिवगडे, निखिल रामटेक, राजेन्द्र फुलझेले,धर्मपाल बागडे, राहूल पाटील, गौतम नितनवरे, आनंद चव्हाण, शैलेश दिवे, रॉबिन निकोसे, गौरव माहोरे, महेश धोंगडे, केतन भिवगडे, चिराल वैद्य, अश्वमेघ पाटिल,अजय चहाण, निशांत मोटघरे सह आंबेडकरी अनुयायी व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने उपस्थित होते.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809