कन्हान : शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी कन्हान पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचे वृक्ष देऊन स्वागत केले.
पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे हयांनी कन्हान पोलीस स्टेशन चा पदभार सांभाळताच अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहिम सुरु केली. अवैध वाळु तस्करी, जुगार अड्यावर धाड, देहव्यापाराचा पर्दाफाश, नशीले पदार्थचे सेवन करणाऱ्यांवर, अवैध दारु विक्री, गांजा यांचे सह अनेक धंध्यावर कारवाई करित पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी अवैध धंधे चालविणाऱ्यांचा मुसक्या आवळल्याने सोमवार (दि.१४) जुलै ला कन्हान शहर विकास मंच च्या पदा धिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांची सदिच्छा भेट घेतली. अवैध धंध्यावर कारवाई करण्या ची मोहिम सुरु केल्याने शहर विकास मंच च्या पदाधि काऱ्यांनी पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा कारवाई चे कौतुक करित वृक्ष देऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कन्हान शहर विका स मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, लोकेश दमाहे, शुभम बावनकर, साहिल सैय्यद, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, माहेर इंचुल कर, आयुष संतापे, सुर्या संतापे, अनिकेत निमजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809