कांद्री येथे “जय हरी विठ्ठल” च्या गजर्रात आषाढी एकादशी उत्साहात

कन्हान :  श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री – कन्हान येथे ” जय हरी विठ्ठल” च्या गजर्रात श्री हनुमान मंदीर खदान रोड कांद्री पंच कमेटी व्दारे विठ्ठल रूख्मिनी ची पुजा अर्चना करून आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करण्यात येत आहे.
रविवार (दि.६) जुलै २०२५ ला सकाळी ६ वाजता श्री हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड कांद्री- कन्हान येथे दरवर्षी प्रमाणे श्री विठ्ठल रूख्मिनी च्या प्रतिमेचे विधीवत पूजा अर्चना श्री कवडुजी आखरे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचे हस्ते करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी रामाजी हिवरकर, शिवाजी चकोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष दररोज श्री हनुमान मंदीरात सकाळी व संध्याकाळी आरती करिता प्रामुख्याने उपस्थित असणारे भाविक मंडळी चे मंदीर कमेटीच्या वतीने नारळ, पान देऊन पंढरपुर पॅटर्न चे दुप्पटा देऊन स्वागत, सत्कार करण्यात आला. विधीवत पूजा, आरती करून प्रसाद, फळारांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाये सुत्रसंचालन आणि आभा र प्रदर्शन वामन देशमुख हयांनी केले. कार्यक्रमास आयोजक वासुदेव आखरे, गोल्डी पोटभरे, सुरेश चमक, मारोती आष्टनकर, सुनिल प्रजापती, मनोज कश्यप, शिशुपाल कापसे, अशोक किरपान, सुरेंद्र पोटभरे, सौ.मंगला कामडे, ऊषा वंजारी, इंदिरा मसुहरे, ऊषा वाडीभस्मे, सुनिता हिवरकर, मालती वांढरे, दुर्गा आखरे, सीता शेंदरे, इंदु टेंभरे, त्रिवेणी डाहारे, जयस्वा ल ताई आणि हनुमान मंदिर गांधी चौक कांद्री पंच कमेटी आणि मित्र परिवार मंडळीनी उपस्थित राहुन आषाढी एकादशी चा धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरा केला.

For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *