कन्हान : चेत्नात्मक ध्यान योग केंद्र कन्हान व्दारे कालरा सेलिब्रेशन लॉन कन्हान येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटात साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा शनिवार (दि.२१) जून ला चेत्नात्मक ध्यान योग केंद्र कन्हान व्दारे कालरा सेलिब्रेशन लॉन कन्हान येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम प्रमुख अतिथी मा.डॉ.श्रीकृष्ण जामो दकर, मा. एन. एस. मालविये सर, योग गुरू मधुकरजी धोपाडे हयाचे पुष्पगुच्छाने स्वागत करून थाटात साज रा करण्यात आला. यावेळी वरिष्ठ योग गुरू श्री. मधुक रजी धोपाडे हयांनी सर्वांना मार्गदर्शन केले. श्री मधुकर धोपाडे गुरूजी हे गेल्या २३ वर्षांपासुन कालरा सेलिब्रे शन लॉन येथे निशुल्क योग प्रशिक्षण देत आहे. कार्य क्रमाचे संचालन संस्थेच्या अध्यक्षा आशा खंडेलवाल हयांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता छाया नाईक, सविता मोहनकर, अनुराधा कालरा, सुनिता ठाकरे, तेजस्विनी बेलसरे, प्रमिला दुबे, कलावती डांगे, सीमा शेळके, जयश्री मेश्राम, सुगंधाबाई काहळकर, रंजना इंगोले, मनिषा धुडस, मिलिंद मेश्राम, दिलीप ठाकरे, संतोष यादव, सुप्रित बावणे, सुरेश दुबे, पुंडलिक नागपुरे आदीनी सहकार्य केले.
ads: