कन्हान, २६ जून: सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कन्हान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन समाज पार्टी, रामटेक विधानसभा युनिटच्या वतीने सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणा, शिक्षण प्रसार आणि बहुजन कल्याणासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकत त्यांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाची सुरुवात भन्ते के. सी. एस. लामा यांच्या हस्ते झाली. बहुजन समाज पार्टी, रामटेक विधानसभा अध्यक्ष राजेश भाऊ फुलझेले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी रामटेक विधानसभा प्रभारी दिनेश रंगारी, महादेव पाटील, रमेश गजभिये, बाबुलाल प्रसाद, नितीन मेश्राम, केतन भिवगडे, मनोज गोंडाणे, आनंद चौहान, दिवाळू मेश्राम, खुशाल बन्सोड, अनिल मेश्राम, सिद्धार्थ पानतावणे यांच्यासह परिसरातील नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थितांनी शाहू महाराजांचे विचार समाजात पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला
For News & Ads Contact ASP Global News : 9373109809