नागपूर: बहुजन समाज पार्टी (BSP) च्या शहर कार्यालयात ‘आरक्षणाचे जनक’ छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम दक्षिण विधानसभेच्या माजी उपाध्यक्ष वर्षाताई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी नागपूर जिल्हा महिला विंगच्या सचिव कविताताई लांडगे, दक्षिण विधानसभेचे उपाध्यक्ष किरण बोध, न्यू कैलास नगर सेक्टरचे अध्यक्ष हेमंत बोरकर, मध्य नागपूर विधानसभेचे प्रभारी अभय डोंगरे, अध्यक्ष विलास पाटील आणि महासचिव प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते बालचंद्र जगताप, विलास मून, शंकर फुल, अजय डांगे, संभाजी लोखंडे, सचिन कुंभारे, विनोद नारनवरे, नितीन वंजारी हे देखील उपस्थित होते.
या आनंदोत्सवाचे प्रतीक म्हणून, मध्य नागपूरचे महासचिव प्रवीण पाटील यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान, चहापाण्याची उत्तम व्यवस्था सचिन कुंभारे यांनी केली होती, तर हार आणि फुलांची व्यवस्था किरण बोध यांनी पाहिली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन नितीन वंजारी यांनी सूत्रबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी विलास मून यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil- CEO ) : 9373109809