नगरपरिषद मुख्य प्रवेश द्वारावर अशोक स्तंभ व संविधानची प्रस्तावना निर्माण करण्याची मागणी

कन्हान : नगरपरिषद कन्हान-पिपरी इमारती समोर भारताचे राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभ आणि संविधाना ची प्रस्तावना ही स्थापित करण्याची आग्रही मागणी स्थानिकांनी नगरपरिषद कन्हान-पिपरी मुख्याधिकारी दीपक घोडके हयाना निवेदन देऊन केली आहे. या मागणी ला विविध संघटनेचे जाहीर समर्थन आहे.अखंड भारताचे निर्माते सम्राट अशोक यांच्या मौर्य शासनात संपुर्ण भारताचा लोहा विश्वाने मानला होता. मौर्यकाळात अशोक स्तंभ हे सुशासन, सामाजि क न्यायव्यवस्था, शांति आणि एकतेचे प्रतिक म्हणुन विश्व विख्यात होते. तसेच नगर संरचना या व्यवस्थेचा उगम व प्रयोग सर्वप्रथम मौर्य शासनात केला गेला. मौर्य शासनात नगराच्या प्रमुखा ला नागरक जो एक नगराचा प्रमुख असुन नगराला नियंत्रित कारायचा आणि अशे आठ प्रमुख नगर कंधार, साहबाजगडी, मेरठ, सारनाथ, कौशांबी, सांची, गिरनार, ब्रह्मगिरी याच प्रणालीवर नियंत्रण चालायचे.
या पार्शभुमिवर कन्हान नगरपरिषद इमारती समोर भारताचे राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभ आणि संविधानाची प्रस्तावना ही स्थापित करण्याची आग्रही मागणी स्थानिकांनी नगरपरिषद कन्हान-पिपरी मुख्या धिकारी दीपक घोडके हयाना निवेदन देऊन केली आहे. या स्थापत्यामुळे नागरिकां मध्ये संविधाना विष यी जागरूकता वाढेल, नव्या पिढीला लोकशाही मूल्यां चे शिक्षण मिळेल, तसेच सार्वजनिक वास्तु मध्ये राष्ट्री य प्रतिकांचा सन्मान वाढेल. कन्हान ची ही ऐतिहासि क मागणी असुन ही मागणी ब्लैक इंडियन पँथर चे रॉबिन निकोसे, नितीन मेश्राम, गणेश भालेकर, चिराल वैद्य, राजेश फुलझेले, मंगेश मनघटे, राजेंद्र फुलझेले, के सी एस लामा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष भदंत के सी एस लामा, एमजीएस संघटनेचे अध्यक्ष नेवालाल पात्रे, राजे फाऊंडेशन अध्यक्ष केतन भिवगडे, मानवता संघ टनेचे सचिव अजय चव्हाण आदीनी उपस्थित राहुन आपला पाठिंबा देऊन केली आहे. मुख्याधिकारी साहे बानी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करू असे ठाम आश्वासन पण दिले आहे. तसेच मा. मुख्यमंत्री, महारा ष्ट्र राज्य, सचिव नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई -३२, मा. आमदार, मा. खासदार, मा. जिल्हाधिकारी नागपुर, मा. विभागीय आयुक्त, नागपुर विभाग नागपु र, मा. उपविभागिय अधिकारी रामटेक, मा. तहसिल दार पारशिवनी हयाना निवेदनाच्या प्रतिलिपी अग्रेशित करण्यात आल्या आहे.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *