धर्मराज विद्यालय येथे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण यात आले.

कन्हान : धर्मराज विद्यालय कांद्री – कन्हान येथे राष्ट्रीय हरित सेना व सामाजिक वनीकरण विभाग, वन परिक्षेत्र पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढुन जनजागृती करित उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
शनिवार (दि.१९) जुलै ला सकाळी ९ वाजता धर्मराज विद्यालय पटांगणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डुकरे सर तर प्रमुख पाहुणे वन परिक्षेत्र अधिकारी के. एस. कैलुके यांचे हस्ते वृक्ष पूज न करून कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली.प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी के. एस. कैलुके यांनी वृक्षांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवुन देत मार्गदर्शन केले. यावेळी वनरक्षक एस. एम. चोपडा, वन मजुर शेंडे,सौ. किरण कैलुके, माजी नगरसेवक राजेश शेंदरे, वनपाल एच. राठोड, पत्रकार एस.एन मालविये सर, दिनेश नानवटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक मोहन भेलकर हयांनी केले. विभागीय वन अधिकारी एस.एम. राऊत यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपनाची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी संगीत शिक्षण नरेंद्र कडवे व चमुनी पर्यावरण गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचाल न राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख विलास डाखोळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ विद्या मोहिते यांनी केले. यानंतर वृक्षदिंडी काढुन नगर परिक्रमा करित वृक्षरोपन आणि वृक्ष संवर्धनाची जनजागृती करून विद्यालयात आणि परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. बालमवार मॅडम, रेवतकर मॅडम, खंते मॅडम, मेहर मॅडम, गेडाम मँडम, दिनेश ढगे, नरेंद्र कडवे, विजय पारधी, फंदे सर, हरिश पोटभरे, गोन्नाडे सर, मंगर सर, गेडाम सर, पर्यवेक्षक राठोड, महल्ले सर , भस्मे सर, राऊत सर, गंगराज सर, गणेश चिंचुलकर, शंकर साखरकर, महादेव मूंजेवार, रतन वंजारी, संजय साखरकर, अर्चना नेवारे, सेलोकर मॅडम, साठवणे मॅडम, बावनकुळे मॅडम, जिभकाटे मॅडम, कु .आरेकर आदीनी सहकार्य केले.

For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *