राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत बी.के.सी.पी . शाळेच्या विद्यार्थ्यांचा उज्वल यश

कन्हान : रेशीमबाग, नागपुर येथील सुरेश भट सभा गृहात जुलै २०२५ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पातळी वरील समर अबॅकस स्पर्धा मध्ये बी.के.सी.पी. शाळा, कन्हान येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करित विविध गटांमध्ये विजेतेपद मिळवले. हे सर्व विद्यार्थी कुंदा प्रोॲक्टिव्ह अबॅकस क्लास, कन्हान येथे प्रशिक्ष ण घेत आहेत.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या संख्याज्ञान, वेगवान गणना आणि एकाग्रतेचे उत्तम प्रदर्शन केले. यात मुख्य विजेते –
१) गौरवी तिडके इयत्ता ३री हिचा प्रथम क्रमांक (लिटिल चॅम्प लेव्हल-१), २) सयुक्ता धोटे इयत्ता ५वी – तृतीय क्रमांक (लेव्हल-१), ३) प्रशिता कोंगे इयत्ता ५वी – सहावा क्रमांक (लेव्हल-१) , ४) सान्वी केशट्टी इयत्ता ६ वी – पाचवा क्रमांक (लेव्हल-२), ५) रुद्राक्ष यादव इयत्ता ५ वी – तृतीय क्रमांक (लिटिल चॅम्प लेव्हल-३), प्रोत्साहन पुरस्कार विजेते – १) आराध्या डांगे इयत्ता ५ वी – (लेव्हल-२), २) पूर्वी लेंडे इयत्ता ५वी – (लेव्हल-२), ३) दीप गायकवाड इयत्ता ३री – (लिटिल चॅम्प लेव्हल -१) , ४) जय निवाल इयत्ता ४ थी – (लिटिल चॅम्प लेव्हल-३), ५) अवनी पोपळकर इयत्ता ५ वी – (लेव्हल-१), ६) टिशा पुणेकर इयत्ता ६ वी – (लेव्हल -१)
विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशामुळे संपुर्ण शाळा, शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग अत्यंत आंनदित होत अभिमानित झाले आहे. पालक आणि कन्हानवासी
यानी विद्यार्थ्यांचे मनपुर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *