कन्हान : कांद्री नगरपंचायत येथील लोकवस्तीत स्वच्छता व आरोग्य विषयक प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी याबाबत ग्रामस्थांनी एकत्र येऊन कांद्री नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन माजी सरपंच बलवंत पडोळे यांच्या नेतृत्वात कांद्री नगरपंचायत मुख्याधिकारी मा. सचिन गाढवे हयांना निवेदन देऊन शहरात वाढत्या डासांमुळे होणारे आजार, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आणि मोकाट जनावराच्या उपद्रवा मुळे निर्माण होणारे धोक्या बाबत माहिती दिली. तर जनतेच्या समस्या गांभीर्याने कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहरात फॉगिंग मशीन द्वारे औषध फवारणी, मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त, मोकाट जनावरांसाठी सुरक्षित व्यवस्था त्वरित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात माजी सरपंच श्री बलवंत पडोळे, राजु देशमुख, गणेश सरोदे, राहुल टेकाम, सुनील बर्वे, स्वप्नील पोटभरे, विवेक वांढरे, किशोर वांढरे, रोहित पानतावणे, विक्रांत सोनी, सचिन कलारे, नितेश नान्हे आदी ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
For News and Ads contact ASP Global News( Ashwamegh Patil ) : 9373109809