मा. तहसिलदार वाघचौरे हयाना भाजप गटनेते राजेंद्र शेंदरे च्या नेत्तुवात निवेदनाने मागणी.
कन्हान : सहा महिन्यापासुन पारशिवनी तालुक्या तील संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजने च्या अनेक लाभार्थी योजने पासुन वंचित असल्याने त्यांचे उर्वरित अनुदान त्यांच्या बँक खात्यात पाठवुन हे अनुदान नियमित देण्याची मागणी भाजप कन्हान नगरपरिषद माजी गटनेते राजेंद्र शेंदरे यांच्या नेतुत्वात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी पारशिवनी तहसिलदार मा. सुभाष वाघचौर हयाना निवेदन देऊन केली आहे.
भारतीय जनता पार्टी कन्हान व्दारे नगरपरिषद माजी गटनेते मा. राजेद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात पारशि वनी तहसिलदार मा. सुभाष वाघचौरे साहेब यांना संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभा थ्याना अनेक दिवसापासुन अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे निराधारांच्या अडचणित दिवसेदिवस वाढ होत चाललेली आहे. शासनातर्फे अनुदान देण्यात येते परंतु गेल्या सहा महिन्यापासुन पारशिवनी तालु क्यातील संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजने च्या अनेक लाभार्थी लोक या योजने पासुन वंचित आहेत. विधवा, अपंग, वयोवृद्ध, निराधार व्यक्तींना बँक खात्यात १५०० रु. देवुन त्यांना मदतीचे शासनाचे धोरण योग्य आहे. परंतु तहसिल कार्यालयात निराधार व्यक्तींना आधारकार्ड आणि बँक पासबुक, मोबाईल ओटीपी सांगा असे सांगुन वारंवार पारशिवनी तहसिल च्या चकरा मारून सुद्धा निराधार व्यक्तींच्या बँक खात्यात अनुदान जमा होत नसल्याचे जानवत आहे. तसेच आधार केंद्र काही दिवसापासुन बंद असल्यामु ळे हया निराधार लाकांचे आधार कार्ड अपडेट होत नसल्याने ते सर्व या योजने पासुन वंचित आहेत. बहुतांश सर्व निराधार व्यक्तींनी आधारकार्ड आणि बँक पासबुक मोबाईल ओटीपी देवुनं पारशिवनी तहसिल कार्यालयाची प्रक्रीया पुर्ण केलेली आहे. तरी सुद्धा त्यांच्या खात्यात अजुनही सात महिने किंवा आठ महिने झालेले आहे तरी सुद्धा त्यांच्या खात्यात एका महिण्याचे पैशे आलेले आहे व सहा किंवा सात महिण्याचे पैसे त्यांच्या खात्यात अजुनही आलेले नाही. करिता निराधार योजनेचे उर्वरीत अनुदान ज्या व्यक्तींच्या खातात अनुदान रक्कम आलेले नाहीत त्या निराधार गरजु व्यक्तीना लवकरात लवकर पाठवुन लाभ देण्यात यावा. असे प्रामुख्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे, जिल्हामंत्री अतुल हजारे, पारशिवनी मंडल अध्यक्ष राहुल मेंगर, भाजपा पारशि वनी तालुका उपाध्यक्ष शैलेश शेळके, प्रकाश वांढे, अशोक कुथे, आशिष दिवटे, माजी नगरसेविका संगि ता खोब्रागडे, अनिता पाटिल, वंदना कुरडकर, सुनंदा दिवटे, सागर सायरे, मनोज कुरडकर, नीलकंठ मस्के, डॉ. प्रमोद भड, नंदलाल बावनकुळे, संजय रंगारी, चिंटु वाकुडकर, आंनद शर्मा, दीपंकर गजभिये, प्रकाश कांबळे, दिवाकर भोयर, सतीश वाड़ीभस्में, नितेश वासनिक, खोब्रागडे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
For News and Ads contact ASP Global News 9373109809