कन्हान : गांधी चौक ते रेल्वे स्टेशन रोड पर्यंत नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र नाली बांध कामात आनंद गजबिये यांच्या घरा पासुन आर्यन मेश्राम यांच्या घरा पर्यंतचा भाग पूर्णपणे वगळुन चोरी करण्यात आल्याने संबधित कंत्राटदार आणि अधिका-यावर यग्य कारवाई करून ही नाली व्यवस्थित पुर्णपणे बांधण्यात यावी अशी मागणी राजे फाऊंडेशन कन्हान व्दारे मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन करण्याच आली आहे.
शहरातील प्रभाग क्र.३ मध्ये गांधी चौक ते रेल्वे स्टेशन रोड पर्यंत नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र सदर नालीच्या बांधकाम आनंद गजबिये यांच्या घरा पासुन आर्यन मेश्राम यांच्या घरा पर्यंतचा भाग पूर्णपणे वगळण्यात आला असुन त्या ठिकाणी नाली तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे आर्यन मेश्राम यांच्या घरा समोरील तसेच त्या भागातील इतर नागरि कांच्या घराचे सांडपाणी नाली अभावी उलट दिशेने वाहुन एका गटारात साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असुन आरोग्याच्या दृष्टीने देखील गंभीर दुष परिणाम होण्याची शक्यता टाळु शकत नाही. अश्या परिस्थितीत नाली बांधकामाची त्वरित चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच मान्सुन उशिरा असल्याने पाऊस चालु होण्या पूर्वी जर नाली चे बांधकाम व्यवस्थित पूर्ण झाले नाही तर या भागात लोकांचा घरात सांडपाणी व पाऊसाचे पाणी शिरल्या शिवाय राहणार नाही. तश्या वेळेस कुठलिही जीव हाणी झाली तर हयाची संपुर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील. असे निवेदन राजे फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाने नगरपरिषद मुख्याधिकारी मा. दिपक घोडके हयाना देण्यात आले आहे. शिष्टमंडळात राजे फाऊंडेशन कन्हान चे केतन भिवगडे, नितीन मेश्राम, प्रशांत मसार, रॉबिन निकोस, गणेश भालेकर, चिराल वैद्य, महेश धोंगडे, राजेंद्र व राजेश फुलझले प्रामुख्याने उपस्थित होते.
Ads : For New & Ad Contact ASP Global News 9373109809