कन्हान : – पर्यावरणाच्या आणि सामाजिक सलोख्या च्या संदेश देत सायकलने अमरनाथ ला बाबा बर्फानी च्या दर्शनाला जाणाऱ्या भक्ताचे कन्हान नगरीत जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भगवा दुपट्टा आणि पुष्पमाला घालुन जल्लोषात स्वागत केले.
भक्त मनिष देशपांडे हे सायकल चालक गेल्या अनेक वर्षां पासुन “ पाणी वाचवा, झाडे लावा, प्रदुष णाला आळा घाला ” तसेच अनेक पर्यावरणावर संदेश देत भारत भर फिरत असतात. शुक्रवार (दि.२०) जुन ला दुपारी १२ वाजता दिघोरी नागपुर येथुन सायकलने अमरनाथ यात्रेसाठी त्यांचा प्रवास सुरु झाला. कन्हान नगरीत आगमन झाले असता जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चंद्रिका बाजार हनुमान मंदिर कन्हान येथे श्यामबाबु पिपलवा, युवा पत्रकार ऋषभ बावनकर यांचे प्रमुख उपस्थितीत भक्त मनिष देशपांडे यांचा भगवा दुपट्टा आणि पुष्पमाला घालुन जल्लोषात स्वागत करून भावी उपक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी श्यामबाबु पिपलवा, युवा पत्रकार ऋषभ बावनकर, सकल हिंदु समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष शुभम बावनकर, वामन देशमुख, आयुष संतापे, बशिष्ट यादव, शोर्या संतापे, मधुकर कुंभलकर, वसंत गुप्ता, सुरेश बावने, अंकुश बादुले, शिवा कोकुडे , भिमसिंग ठाकुर, यश महालगवे, मंदिश ठाकरे, निरज सोनी सह भक्त प्रामुख्याने उपस्थित होते.
ads: