<<<<- कन्हान, पारशिवनी, सावनेर, रामटेक, कामठी, मौदा, कुही तालुक्याचे कर्जमुक्ती अर्ज’ देण्यास उत्सफुर्त प्रतिसाद.- >>>
कन्हान : शेतकरी नेते व किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आवाहना ला शेतक-यांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत तिस-या टप्यात मा. मुख्यमंत्री हयाना जिल्हाधिकारी नागपुर मार्फत जिल्हा ग्रामिण भागातुन कन्हान, पारशिवनी, सावनेर, रामटेक , मौदा, कामठी, कुही तालुक्यातील शेतक-यांच्या यादीसह निवेदन देऊन, मागेल त्यालाच /गरज त्याला च कर्जमुक्तीचे १९० अर्ज सादर करण्यात आले.
नागपुर जिल्हयातील आम्ही अनेक शेतकरी कर्ज बाजारीपणामुळे हैराण झालेलो आहोत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिक उत्पादन कमी झाले, आयात निर्यात धोरणामुळे पिकांचे भाव सुद्धा पडलेले आहेत, त्यामुळे शेतीला लावलेला खर्च सुद्धा निघाले ला नाही. परिणामी बँकेचे घेतलेले कर्ज सुद्धा आम्ही फेडु शकत नाही, संसार कसा चालवावा, तसेच नवीन हंगामा करिता पैसे कुठुन आणायचे या विवंचनेत शेतकरी आहेत. आत्महत्या करण्याचे विचार आमच्या डोक्यात घोंगावत आहेत. विदर्भातील काही शेतकऱ्यांनी आत्म हत्या केलेल्या आहेत.
या निवडणुकीत आम्ही सत्तेवर आलो तर कृषी कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन सत्ताधारी पक्षांनी दिले होते, त्यामुळे आशेचा एक किरण आम्हा शेतकऱ्यांना दिसला होता, मात्र ते आश्वासन अद्यापही शासनाने पूर्ण केलेले नस ल्याने आम्ही हताश झालेले असुन आत्महत्यांचे विचार आमच्या डोक्यात येत आहेत. सध्याची आम्हची कर्ज बाजारी अवस्था पाहता शासनाने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करून आम्हाला कर्जमुक्त करून आम चा सातबारा कोरा करून जगण्याची उमेद दाखवावी, याकरिता गुरूवार (दि.१९) जुन २०२५ ला दैनिक देशौन्नतीचे मुख्य संपादक व शेतकरी नेते आणि किसान ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आवाहनाला शेतक-यांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत तिस-या टप्यात जिल्हयातील कन्हान, पारशिवनी, सावनेर, रामटेक मौदा, कामठी, कुही या तालुक्यातील शेतक-यांच्या नावाच्या यादी सह एकुण १९० अर्ज उपजिल्हाधिकारी नागपुर मा. अनुपजी खांडे हयाना राष्ट्रवादी (शरद पवार गट) नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष मा. किशोर बेलसरे, पारशिवनी कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर, देशौन्नती कन्हान पत्रकार मोतीराम रहाटे, किसान ब्रिगेड पारशिवनी तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे यांच्या शिष्टमंडळाने निवेदनासह कर्जमुक्ती १९० अर्ज सादर करून मागेल त्यालाच / गरज त्याला च कर्जमुक्ती अंतर्गत कर्जमुक्ती मागणी व बँक कर्ज भरणा वापसी अर्ज शासनाकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या नावासह अर्ज मा. मुख्यमंत्र्यांकडे पाठवावेत अशी विनंती करण्यात आली. याप्रसंगी मा. किशोर बेलसरे, पुरणदास तांडेकर, मोतीराम रहाटे, किसान ब्रिगेड पारशिवनी तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे, श्रीधरजी झाडे, सतिश बेलसरे, मनोज गुडधे, इंद्रपाल गोरले, डुमन चकोले, पवन काठोके, रामु लांडगे सह शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
Ad: