कन्हान : औद्योगिक विकासाच्या नावावर शेतक-यां च्या शेतजमिनी अग्रिम मोबदला देऊन त्या जमीनीचा अवार्ड पास न करता तसेच कुठलाही फेरफार न कर ता परस्पर शेतकऱ्यांच्या ७/१२वर औद्योगिक विकास महामंडळाचे नाव दर्ज केल्याने शेतकरी भुमिहिन होऊ न बेरोजगार झाला. तसेच ५३ वर्षात कुठलाही उद्योग सुरू न केल्याने १५ दिवसात ७/१२ शेतक-यांचे नावे फेरफार करा. अन्यथा आपल्या कार्यालया सामोर उपो षण करण्याची परवानगी द्या. अशी मागणी एसडीओ रामटेक हयाना निवेदन देऊन पिडीत शेतक-यांनी केली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नागपुर यानी १९७२ मध्ये टेकाड़ी आणि कांद्री च्या शेतक-यां च्या शेत जमिनी औद्योगिक विकासाकरिता जमीनीचा ८० टक्के अग्रिम मोबदला देऊन त्या जमीनीचा अवार्ड पास न करता तसेच कुठलाही फेरफार न करता परस्प र शेतकऱ्यांच्या ७/१२ वर औद्योगिक विकास महामंड ळाचे नाव दर्ज केल्याने शेतकरी भुमिहिन होऊन बेरो जगार झाला. या सातबारा सर्वे नं. ४९३ जमिनीवर ५३ वर्षांत एकही उद्योग उभारला नाही. यामुळे शेतक-या नी वेळोवेळी तहसिलदार पारशिवनी, एसडीओ रामटे क, जिल्हाधिकारी नागपुर आणि संबधित कार्यालयास पत्र देऊन ७/१२ वर चुकीने फेरफार केल्याने आम्हा ला शेत जमिन परत द्या. किवा योग्य मोहबदला देऊन न्याय देण्याची मागणी करून सुध्दा न्याय न मिळाल्या ने ग्राम पंचायत टेकाडी येथील समाधान शिबीरात मा. प्रियेश महाजन उपविभागीय अधिकारी रामटेक (एस डीओ) व मा.सुभाष वाघचौरे तहसिलदार पारशिवनी हयाना निवेदन देऊन १५ दिवसात ७/१२ पिडीत शेत क-यांच्या नावे फेरफार करा. अन्यथा आपल्या उपवि भागीय कार्यालय रामटेक सामोर परिवारासह उपोषण करण्याची परवानगी द्या. अशी मागणी कन्हान औद्यो गिक क्षेत्र पिडीत शेतकरी वामन जगंलु कोल्हे,चंद्रभान जगंलु बर्वे, शिवशंकर राऊत, रविशंकर यादोवराव राऊत, अशोक भदुजी हुड, प्रविण अशोक हुड हयानी केली आहे.
